ग्रामपंचायत शेळकबाव
"स्वच्छ गांव सुंदर गांव "
(स्थापना १९५६)
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
एकूण लोकसंख्या
शिक्षित लोकसंख्या
अशिक्षित लोकसंख्या
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाबद्दल माहिती व इतिहास!
शेळकबाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. या गावाचा इतिहास चौथ्या शतकापासून मिळतो. पुर्वी या गावास मौजे शेळकबाव असे म्हणत. या गावात पूर्वी कासार लोकांची वस्ती होती. परकियांनी (मोघल, तुर्क, तैमुर, इराण) आक्रमण होत असतांना काही लोकांनी येथुन स्रथलांतर केले.
११ व्या शतकात कदम या आडनाव असलेल्या लोकांची वस्ती झाली. त्यांच्या सोबत बौद्ध, जैन, नाईक लोकही स्थिर झाले. पुढे शिवकाळात रामोशी लोकांची वस्ती वाढली. आज रोजी शेळकबाव गावात बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार कोणीही नाही. शेजारील कसबे वांगी भाळवणी येथील हे लोक सेवा देतात. या गावात सध्या या लोकांपैकी सुतार, मातंग, बौध्द, नाईक व मराठा लोकांची वस्ती आहे. पश्चिमेकडील येरळा (वेदवती) व पूर्वेस ओढ्यामुळे बेचक्यात असलेला या गावास गावठाण कमी आहे. त्यामुळे लोक आपल्या सोई प्रमाणे समूहाने राहतात. त्याची नावे मळी वस्ती, पळसवाडा (नवावाडा), तिनबिगा वस्ती, घवळ, यादव वस्ती, लवान वस्ती, नारगवंडी वस्ती, सुताकरी, मधला गोठा, वरचा गोठा (यशवंतनगर), घोलवस्ती इत्यादी ठिकाण वस्त्या आहेत.
शेळकबावची एकूण लोकसंख्या (2011 प्रमाणे) 1976 असून साक्षरता दर 95% आहे. गावात हनुमान मंदिर, महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर आणि एक ऐतिहासिक मशिद आहे. गावाला ताकारी आणि टेंभू कॉनॉलद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा होतो, तर नागरी पाणीपुरवठा जलजीवन मिशन अंतर्गत आहे. हे गाव कडेगाव तालुक्यात (15 किमी) असून सांगली लोकसभा मतदारसंघात येते.
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
तक्रार निवारण विभाग
- पत्ता: ग्रामपंचायत शेळकबाव ता.कडेगांव, जि. सांगली.
- ग्रामपंचायत अधिकारी: ९९७०५४२८३३
- ईमेल: shelakbavgpkadegav@gmail.com
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!
